|
प. पू.
श्रीवासुदेवानन्दसरस्वती स्वामीमहाराजांच्या
‘शिक्षात्रयम्’
या ग्रंथाचा प्रास्ताविक परिचय, या ग्रंथाचे महत्त्व, त्याची
उपयुक्तता यांचे विवेचन संस्कृतचा विशेष अभ्यास नसणाऱ्या
साधकांकरीता करण्याचा पू. गुरुचरणांचा आदेश झाल्याने
‘यथाधीतम्’
‘यथामति’
या सूतांच्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी प्रयत्न केला आहे. प. पू.
श्रीस्वामीमहाराजांच्या वाङ्मयाचे महत्त्व अनेकविध आहे. अनेक
साहित्यिक गुणांनी मण्डित असलेले, अद्वैतवेदान्त-सिद्धान्तांची
सूक्ष्म बैठक असलेले, अदृष्टप्राप्ति व चित्तशुद्धी प्राप्त करून
देणारे हे वाङ्मय पीच.एच.डी. परीक्षेचा विषय बनले यात आश्चर्य
नाही. या वाङ्मयाची उपासनेद्वारा होणारी उपयुक्तता दृष्टीआड करून
चालणार नाही. स्वामीमहाराजांच्या संप्रदायात प्रसिद्ध असलेल्या
प्रश्नावलीतून अनेकांना जी साधने मिळतात त्यात
‘शिक्षात्रयाचे
सार्थ वाचन’
असे एक आहे. या साधनाचे अनुष्ठान करणाऱ्या उपासकांना हे विवेचन
मननासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
‘शिक्षात्रयम्’
या ग्रंथाचे कुमारशिक्षा, युवशिक्षा व वृद्धशिक्षा असे तीन
पोटभाग असून त्यांचे विवेचन क्रमशः करू. |